CNG पासून ते कूपे स्टाईल SUV पर्यंत; TATA आणतीये 3 जबरदस्त कार

टाटा मोटर्स आपल्या कार पोर्टफोलिओला सध्या अपडेट करत आहे. नुकतंच कंपनीने टिगोर आणि टिएगोला सीएनजी ऑटोमॅटिकमध्ये सादर केलं होतं.

कंपनीच्या या लाईन अपमध्ये काही अन्य मॉडेलही आता सहभागी झाले आहेत. याचवर्षी या कार लाँच केल्या जाऊ शकतात. या कार कोणत्या आहेत ते जाणून घ्या...

Tata Curvv

Tata Curvv ही कंपनीची बहुप्रतिक्षित कुपे स्टाइल SUV आहे. भारतातील मोबिलिटी एक्स्पोमध्ये तिला अखेरचं सादर करण्यात आलं होतं. विशेश म्हणजे तिला पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारात सादर केलं जाऊ शकतं.

Tata Curvv च्या ICE व्हर्जनमध्ये कंपनी 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेलचा वापर करत आहे. दुसरीकडे सीएनजी व्हर्जनही ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानयुक्त आहे.

Tata Curvv EV म्हणजेच इलेक्ट्रिक व्हर्जन ताशी 400 किमीची रेंज देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये पॅनारॉमिक सनरुफसारखे फिचर्स मिळतील.

Tata Nexon CNG

टाटाने भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये Nexon CNG ला समोर आणलं होतं. या एसयुव्हीला 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सादर केलं जाणार आहे. याची तांत्रिक माहिती पूर्णपणे समोर आलेली नाही.

Tata Altroz Racer

Tata Altroz चा Racer व्हेरियंट कंपनीने ऑटो एक्स्पोदरम्यान पहिल्यांदा समोर आणला होता. यामध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं जात आहे. जो 118 hp ची पॉवर आणि 172Nm चा टॉर्क जनरेट करते.

हा कार फक्त मॅन्यूअल व्हेरियंटमध्ये सादर करण्याची शक्यता आहे. पण यामध्ये खास स्पोर्टी लूक आणि डिझाईन पाहायला मिळेल. आगामी काही महिन्यात ही लाँच केली जाऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story