सर्वात श्रीमंत राज्याची मतदानाकडे पाठ! यादीत महाराष्ट्र तळाशी; Voting % पाहून बसेल धक्का

Swapnil Ghangale
May 21,2024

49 मतदारसंघांमध्ये मतदान

सोमवारी म्हणजेच 20 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. देशातील 5 राज्यांमधील 49 मतदारसंघांमध्ये मतदान झालं.

सर्वाधिक मतदान कुठे?

यापैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजेच 73% टक्के मतदान झालं.

लडाखमध्येही चांगला प्रतिसाद

पश्चिम बंगालखालोखाल लडाखमध्ये एकूण 67.15 टक्के मतदान झालं.

झारखंड तिसऱ्या स्थानी

सर्वाधिक मतदान झालेल्या राज्यांच्या यादीत झारखंड तिसऱ्या स्थानी आहे. इथे 61.90 टक्के मतदान झालं.

चौथ्या आणि पाचव्या स्थानी कोण?

त्याखालोखाल ओडिशामध्ये 60.55 टक्के मतदान झालं. उत्तर प्रदेशमध्ये 55.80 टक्के मतदान झालं.

बिहारमध्येही 52 टक्क्यांहून अधिक मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये 54.21 टक्के मतदान झालं. तर बिहारमधील मतदानाची टक्केवारी 52.35 टक्के इतकं झालं.

महाराष्ट्रातील लोकांची मतदानाकडे पाठ

देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी मात्र मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आळं.

महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यातील सर्वात कमी म्हणजे 48.66 टक्के मतदान झालं. ही बाब फारच निराशाजनक बाब आहे.

VIEW ALL

Read Next Story