आर्थिक ओझं वाढवू नका

असं केल्यास पगाराचा मोठा भाग तुम्ही अन्न, कपडे, घऱ, शिक्षण, आरोग्य आणि सेव्हिंगसाठी खर्च करु शकता. हा फॉर्म्युला अवलंबलात तर तुम्ही कोणताही आर्थिक ओझं न घेता कारमधून प्रवास करु शकता आणि इतर सर्व खर्चही सहज करु शकता.

सेकंड हॅण्ड कारचं आर्थिक गणित काय?

अशा स्थितीत जर तुम्ही सेकंड हॅण्ड कार खरेदी केली तर 3 ते 4 लाखात मिळून जाते. तीन लाखात खरेदी केलेल्या कारसाठी 1 लाखांचं डाऊन पेमेंट केल्यास तुम्हाला फक्त 2 लाखांचं कर्ज घ्यावं लागेल. अशामध्ये तुमचा EMI 4103 रुपये असेल आणि पाच वर्षात तुम्हाला फक्त 2 लाख 46 हजार 198 रुपये भरावे लागतील.

गाडीवर किती खर्च करावा?

मुद्द्याची बाब म्हणजे, वाहन कर्जावर तुम्ही महिन्याच्या कमाईचा 7 ते 10 टक्के भागच खर्च केला पाहिजे. याप्रमाणे जर तुमचा पगार महिन्याला एक लाख रुपये असेल तर महिन्याला EMI वर 7 ते 10 टक्के म्हणजेच 12 हजार 310 रुपये खर्च होतील.

नवीन कार घेतल्यास किती पैसे खर्च होतात?

डाऊन पेमेंट केल्यानंतर कार खरेदी केली तरी त्यावर 5 ते 6 लाखांचं कर्ज घेतलं जातं. 6 लाखांच्या कर्जावर पाच वर्षांसाठी 8.50 टक्के व्याजदर आकारल्यास तुम्हाला 12 हजार 310 रुपयांचा EMI भरावा लागतो. म्हणजेच तुम्ही एकूण 7 लाख 38 हजार 595 रुपये भरता.

सेकंड हॅण्ड खरेदी करणं जास्त योग्य

जर तुमचा पगार 1 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही नवी कार खरेदी करण्याच्या मोहात पडू नये. अशावेळी तुम्ही सेकंड हॅण्ड कार खरेदी करणं जास्त योग्य ठरतं.

गाडी घेण्याआधी विचार करा

आपली स्वत:ची हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. काहींना गरज म्हणून तर काहींना आपला स्टेटस दाखवण्यासाठी गाडी हवी असते. अनेकदा लोक पुढचा मागचा विचार न करता गाडी खरेदी करतात. पण नंतर त्याचा आर्थिक भार मात्र त्यांना सहन होत नाही आणि पछतावण्याची वेळ येते.

VIEW ALL

Read Next Story