तज्ज्ञांच्या मते 2028 पर्यंत मार्केटमध्ये असे स्मार्टफोन येतील ज्यांची स्क्रीन फुटल्यानंतर आपोआप दुरुस्त होईल. CCS Insight च्या विश्लेषकाने ही माहिती दिली आहे.
CCS Insight मते पुढील पाच वर्षात या सेल्फ हिलिंग फिचर स्मार्टफोन्सची निर्मिती सुरु होऊ शकते.
LG ने 2013 मध्ये एक कॉन्सेप्ट फोन सादर केला होता. ज्याचा बॅक पॅनल स्वत:हून दुरुस्त होतो. पण तो स्मार्टफोन कधीच लाँच झाला नाही.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, नैनो कोटिंगमुळे हे शक्य होणार आहे. जर फोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच आले, तर या कोटिंगमुळे डिस्प्ले स्वत:हून दुरुस्त होईल.
तज्ज्ञांच्या मते हे फक्त सायन्स फिक्शन नाही, तर वास्तवात शक्य आहे. कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून यावर चर्चा करत आहेत.
LG च नाही तर इतरही अनेक कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर भाष्य केलं होतं. 2017 मध्ये मोटोरोलाने एक पेटंट फाइल केलं होतं.
पेटंटनुसार, ही स्क्रीन फुटल्यानंतर आपोआप दुरुस्त होणार. यामागे कल्पना अशी होती की, जेव्हा स्क्रीनला गरम केलं जाईल तेव्हा मटेरियल स्वत:ला दुरुस्त करेल.
याआधी Apple नेही एक पेटंट फाइल केलं होतं. हे पेटंट एका फोल्डिंग फोनचं होतं, ज्याची स्क्रीन स्वत:ला दुरुस्त करु शकत होती. पण अद्याप असा फोन लाँच झालेला नाही.