भारतात 5 ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. पण स्पर्धेआधी उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं नव्हतं
आता 14 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी अहमदाबदाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत. 1 लाख 32 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शनिवारी रंगारंग कार्यक्रम पाहिला मिळतील.
भारत-पाकिस्तान सामन्याला दुपारी दोन वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी 12.30 वाजता गायक अरिजीत सिंहच्या परफॉर्मन्सने कार्यक्रमाला सुरुवात होईल
मनोरंजनाचा कार्यक्रम तीस ते 40 मिनिटं चालेल त्यानंतर टॉसच्या 20 ते 30 मिनिटं आधी कार्यक्रमाची सांगता होईल.
भारत-पाक सामन्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांना बीसीसीआयने गोल्डन तिकिट दिलं होतं. या दिग्गजांना आमंत्रित केलं जाणार आहे.
अरिजीत सिंगव्यतिरिक्त सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन यांच्या गाण्याचा कार्यक्रम सादर होईल.