डेटा गोळा केल्याचा आरोप

एका ट्विटर युजरने Realme च्या फोनमध्ये असलेल्या एका फीचरबद्दल माहिती दिली आहे जी युजरच्या माहितीशिवाय डेटा गोळा करत आहे.

कोणत्या फिचरमधून गोळा केला जातोय डेटा

Realme Phones मधील हे फिचर म्हणजे Enhanced Intelligent Services आहे

कोणती माहिती चोरली जात आहे?

या फिचरद्वारे डिव्हाइसशी संबंधित माहितीव्यतिरिक्त, अॅपने वापरेला डेटा आणि युजर इन्फो ग्राहकाच्या संमतीशिवाय माहिती गोळा करत आहे.

सरकारने घेतली गंभीर दखल

माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं की, सरकार या प्रकरणाची चौकशी आणि चौकशी करेल.

काय आहेत आरोप?

एका ट्वीटर युजरने चीनी स्मार्टफोन ब्रँड Realme युजर्सच्या संमतीशिवाय ऑटोमॅटिक एन्हेंस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस चालू करत असल्याबद्दल माहिती दिली आहे.

Enhanced Intelligent Services कशासाठी वापरलं जात आहे?

आरोपांनुसार या फिचरचा वापर भारतीय युजर्सचा डेटा जसे की कॉल लॉग, एसएमएस आणि लोकेशन चीनसोबत शेअर करण्यासाठी केला जात आहे.

BBK Electronics कडे कंपनीची मालकी

Realme ची मूळ कंपनी BBK Electronics आहे आणि तिचे मुख्यालय चीनमधील ग्वांगझो येथे आहे.

या कंपन्यांची मालकीसुद्धा BBK Electronics कडे

Vivo, Oppo, OnePlus, iQOO या सर्व स्मार्टफोन कंपन्या BBK Electronics च्या मालकीच्या आहेत.

या फिचरची मोबाईलमध्ये गरज आहे का?

फोनच्या सेटिंग्जमधील माहितीनुसार, फोनमध्ये असलेल्या अनेक फीचर्ससाठी एन्हांस्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस आवश्यक आहे.

नेमका उपयोग काय?

फोनच्या चार्जिंग ऑप्टिमायझेशन फिचरसाठी, लोकेशन आणि अॅपचा वापर, वॉलपेपर आणि इतर पर्सनलाइझेशन फिचर जसे की न वाचलेले मेसेज, मिस कॉल आणि इतर महत्त्वाची माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story