आजकाल लहान मुलांकडे मोबाईल फोन असणं खूप सामान्य झालं आहे. मग ते गेम खेळणं असो किंवा अभ्यास करत असो,इंटरनेट वापरणं हे त्यांच्या रोजच्या सवयींचा एक भाग बनला आहे.
पण तुम्हाला सुद्धा अशी भीती वाटते का की त्यांनी एडल्ट कंन्टेंट काही दिसलं तर? तुमची ही चिंता दूर कऱण्यासाठी या टिप्सचा वापर करा.
फोनच्या सेटिंग्जमध्ये जा, त्यानंतर त्यामध्ये प्रायवेट DNS शोधा, प्रायवेट DNS क्लित करा, त्यानंतर तिथे बॉक्समध्ये 'family.adguard-dns.com' असे टाइप करा.
ही सेटिंग केल्यानंतर तुमच्या मुलाच्या फोनवरील एडल्ट कंन्टेंटच ब्लॉक केला जातो आणि तुमची देखील खात्री राहते की मुलं काही अयोग्य पाहत नाहियेत.
त्य़ाचबरोबर तुम्ही Google Kids Space देखील वापरू शकता. यासाठी डिजिटल वेलबींग आणि त्यानंतर पॅरेंन्ट कंट्रोल मध्ये जाऊन तुमच्या मुलांचा फोन नियंत्रिक करू शकता.
तुमच्या मुलांनी मोजकेच अॅप वापरावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अॅप पिनिंगचा वापर करू शकता. हे फक्त तुमच्या मुलाला पिन केलेले अॅप उघडण्याती अनुमती देते.
अशा सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या मुलांना एडल्ट कंन्टेंचपासून दूर ठेवू शकता आणि त्यांची ऑनलाईन सुरक्षितता देखील निश्चित करू शकता.