पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसल्याने एखादा संदेश पाठवण्यासाठी कबुतरचा वापर केला जात असे. पण तुम्हाला कधी अला प्रश्न पडला नाही का की कबुतरच का..इतर पक्षी का नाही?
विज्ञानानुसार कबुतरांमध्ये एक वैशिष्ट्ये आहेत जे त्यांना संदेशवाहक बनवतात. कबुतरांमध्ये एक आश्चर्यकारक क्षमता आहे, ते अगदी दुरूनही घर शोधू शकतात.
ही क्षमता त्यांच्या शरीरात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या चुंबकीय संवेदनामुळे असते.
कबुतर वेगाने प्रजनन करतात ज्यामुळे मोठ्या संख्येने कबुतरांना प्रशिक्षित केले जाऊ शकते. कबुतर हे इतर पक्षांपेक्षा अधिक हुशार असतात.
वादळ, पाऊस अशा प्रतिकुल परिस्थितीतही कबुतर उडू शकतात.त्या तुलनेत इतर पक्षी इतके हुशार नसतात.ते त्यांचा मार्ग चुकू शकतात. इतर पक्षी कबुतरापेक्षा वेगाने उडू शकतात पण लांब अंतरापर्यंत उडू शकत नाही.
कबुतरांच्या या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे ते शतकानुशतके संदेशवाहक म्हणून काम करू शकतात. आजकाल दळणवळणाची इतर आधुनिक साधने असली तरी कबुतरांची क्षमता शास्त्रज्ञांसाठी नेहमीच एक आश्चर्याचा विषय राहील.