तब्बल 221 किमी रेंज आणि जबरदस्त पॉवर, लाँच झाली धमाकेदार इलेक्ट्रिक बाईक

इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे दिग्गज कंपन्या नव्या बाईक लाँच करत असताना स्टार्टअपही या स्पर्धेत आहेत.

आता बंगळुरुतील Orxa Mantis ने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत 3.60 लाख आहे.

ही बाईक मुख्यत्वे Ultraviolette F77 च्या बेस व्हेरियंटला स्पर्धा देत आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, ही बाईक खासकरुन रेसिंगसाठी तयार करण्यात आली आहे.

ही सध्या देशातील सर्वाधिक वेगवाने इलेक्ट्रिक बाईक्सपैकी एक आहे.

ही बाईक अर्बन ब्लॅक आणि जंगल ग्रे या दोन रंगात सादर करण्यात आली आहे.

कंपनीने बॅटरीला हायब्रीड अॅल्युमिनिअम केसमध्ये ठेवलं आहे, ज्याला IP67 रेटेड सेफ्टी दिली जात आहे. म्हणजे बॅटरी ऊन, धूळ, पाण्यापासून सुरक्षित आहे.

बाईकला ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. युजर्स स्मार्टफोन बाईकशी कनेक्ट करु शकतात. यासाठी मेंटिस अॅपचा वापर करावा लागेल.

कंपनीने 8.9kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. जो लिक्विड कूल्ड BLDC मोटरला पावर देतो. ही देशातील पहिली लिक्विड कूल्ड सेटअप इलेक्ट्रिक दुचाकी वाहन आहे.

या बाईकचा टॉप स्पीड ताशी 135 किमी आहे. 0 ते 100 चा स्पीड पकडण्यासाठी बाईकला 8.9 सेकंद लागतात.

बाईकचा ग्राऊंड क्लिअरन्स180 मिमी असून वजन 182 किलो आहे.

बाईक सिंगल चार्जमध्ये 221 किमीची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.

10 हजारात तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन बाईक बूक करु शकता. नंतर ही रक्कम 25 हजार केली जाणार आहे.

एप्रिल 2024 मध्ये कंपनी या बाईकची डिलिव्हरी सुरु करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story