केळ हे फक्त चवीदार नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
फक्त केळ नाही तर केळ्याचं साल देखील तितकंच गुणकारी आहे.
केळीच्या सालानं तुम्ही तुमचा तळपाय साफ करू शकता. त्यानं तुमच्या तळपायाला असलेली सगळी घाण निघून जाईल.
केळ्याचे साल जर तुम्ही तळपायाला घासले तर पायाला असलेल्या भेगा आणि डेड स्किन सेल्स देखील दूर होतात.
आणखी एक उपाय म्हणजे केळ्याचं साल बारीक कापूर घ्या आणि त्यात मध मिक्स करा आणि त्याची पेस्ट पायाला लावा अर्ध्या तासानंतर पाय धुवून काढा.
जर तुम्हाला मध वापरायचं नसेल तर त्याजागी तुम्ही कोरफड वापरू शकतात.
केळीच्या सालीपासून स्क्रब बनवायचं असल्यास त्यात मध आणि कॉफी पावडर मिक्स करून पायाची मसाज करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)