BGAUSS ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर

BGAUSS चे नुकतीच आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर C12i EX ला अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केलं आहे.

85 किमीची ड्रायव्हिंग रेंज

ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 85 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. याची बॅटरी IP67 रेटेड आहे. म्हणजेच ही बॅटरी उष्णता, धूळ आणि पाण्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवते. बॅटरी फूल चार्ज होण्यास 4.30 तास लागतात.

बॅटरीजवळ पंखा

स्कूटरमध्ये बॅटरीजवळ एक पंखा लावण्यात आला आहे. जेव्हा स्कूटर सुरु होते तेव्हा पंखा सुरु होतो. यामुळे बॅटरी थंड राहण्यास मदत मिळते.

20 सेफ्टी फिचर्स

स्कूटरमध्ये 20 सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनी बॅटरीसह 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. याशिवाय 5 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी देत आहेत. यासाठी वेगळं पेमेंट करावं लागेल.

70 हजार किमीची बॅटरी लाईफ

याची बॅटरी लाइफ जवळपास 70 हजार किमीपर्यंतची आहे. सामान्यत: एक इलेक्ट्रिक स्कूटर वर्षभरात 10 हजार किमीचा प्रवास करते.

7 वर्षं दणादण धावणार स्कूटर

याचा अर्थ या स्कूटरच्या बॅटरीसंबंधी तुम्हाला पुढील 6 ते 7 वर्षं चिंता करण्याची गरज नाही.

23 लीटरचा अंडरसीट स्टोरेज स्पेस

या स्कूटरमध्ये कंपनीने 23 लीटरचा अंडरसीट स्टोरेज स्पेस दिला आहे. ज्यामध्ये तुम्ही सहजपणे दोन हेल्मेट ठेवू शकता.

किंमत किती?

आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी पॅक असणाऱ्या या स्कूटरची किंमत तब्बल 99 हजार 999 रुपये आहे.

19 सप्टेंबर 2023 पर्यंतच किंमत लागू

रोजच्या प्रवासासाठी ही फार चांगली स्कूटर फार चांगली आहे. जबरदस्त रेंड आणि फिचर्ससह ही स्कूटर उपलब्ध आहे. पण ही सुरुवातीची किंमत फक्त 19 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story