iPhone 15

iPhone 15 साठी भारतात किती रुपये मोजावे लागणार?

Sep 12,2023

स्मार्ट गॅजेट्स

Apple iPhone 15 : भारतीय प्रमाण वेळेनुसार हा कार्यक्रम रात्री 10.30 वाजता सुरु होणार आहे. जिथं आयफोनच्या नव्या मॉडेलसह अॅपल काही स्मार्ट गॅजेट्सही लाँच करणार आहे.

अंदाजानुसार ही किंमत..

अद्यापही iPhone 15 आणि iPhone 15 Plus च्या किमतीची स्पष्टोक्ती झाली नसली तरीही जाणकारांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार ही किंमत 79900 (बेस मॉडेल) असू शकते.

iPhone 15 Plus साठी...

iPhone 15 Plus साठी ग्राहकांना 89900 रुपये मोजावे लागू शकतात. अर्थात अधिकृत किंमत अॅपलचा फोन लाँच झाल्यानंतरच समोर येणार आहे.

किंमत वाढणार

iPhone 15 Pro आणि Pro Max मॉडेलचे दर मात्र वाढू शकतात. जिथं प्रो मॉडेल 100 डॉलर्सनं आणि प्रो मॅक्स मॉडेल 200 डॉलरनं वाढू शकतो.

आयफोन 15 प्रो

अमेरिकेत आयफोन 15 प्रो ची किंमत $999 (82,900 रुपये) वरून वाढून $1,099 (91,200 रुपये) होऊ शकते.

आयफोन प्रो ची किंमत...

भारतात iPhone 15 Pro ची किंमत 1,29,900 ऐवजी 1,39,900 रुपये असू शकते. म्हणजे हा फोन तब्बल 10 हजार रुपयांनी महागणार आहे.

आयफोन 14 आणि 13 चे दर कमी होणार

अमेरिकेत आयफोन प्रो मॅक्सचे दर $1,299 (1,08,000 रुपये) असू शकतात. भारतात त्याची किंमत साधारण 1,59,900 च्या घरात असू शकते. आयफोन 15 बाजारात येताच आयफोन 14 आणि आयफोन 13 चे दर घटणार आहेत. त्यामुळं आता नेमका कोणता आयफोन घ्यायचा हे तुम्हीच ठरवा.

VIEW ALL

Read Next Story