सावधान! फक्त एक मिस कॉल आणि तुमचं बँक अकाउंट होईल रिकामं

सायबर फ्रॉडशी संबंधित तक्रारी दररोज येत असतात. हॅकर्स आणि सायबर चोरटे सतत काहीनाकाही नवीन ट्रिक शोधत असतात.

बँक अकाउंट रिकामे

कधी चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यास किंवा कधी ओटीपी चुकीच्या व्यक्तीला दिल्यास संबंधित व्यक्तीचे बँक अकाउंट एका झटक्यात रिकामे होते.

लाखोंची फसवणूक

मात्र, अलीकडेच एक विचित्र घटना समोर आली आहे. ओटीपी शेअर न करता किंवा चुकीच्या लिंकवर क्लिक न करताही लाखोंचा गंडा घातला जातोय.

50 लाखांचा गंडा

मागील वर्षी स्कॅमरने अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या खात्यातून 50 लाख रुपये काढले होते. एका सिक्युरिटी कंपनीच्या डायरेक्टरला लाखो रुपयांचा गंडा घातला होता.

व्हॉइसमेल

पीडित व्यक्तीने कधीही कोणताच OTP शेअर केला नव्हता ना कोणत्या लिंकवर क्लिक केले. त्या व्यक्तीला स्कॅमरचे अनेक फोन आणि व्हॉइसमेल आले होते.

फोन कॉलकडे दुर्लक्ष

पीडित व्यक्तीला संध्याकाळी 7 ते 8.45च्या दरम्यान अनेक फोन आले होते. त्याने त्यातील एक फोन उचलला होता मात्र पलीकडून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळं इतर फोन कॉलकडे त्याने दुर्लक्ष केले.

SIM Swap Fraud

थोड्यावेळाने त्याच्या फोनवर एख मेसेज आला. यात त्याच्या बँक खात्यातून 50 लाख RTGS ट्रान्सफर करण्यात आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात SIM Swap Fraudचा वापर करण्यात आला होता.

काय असते SIM Swap?

SIM Swapमध्ये तुमच्या फोनवर आलेला ओटीपी आपोआप स्कॅमर्सकडे जातो. इतकंच नव्हे तर तुमचा मोबाईल नंबर आणि पूर्ण अॅक्सेस त्याला मिळतात.

टेलीकॉम ऑपरेटर

स्कॅमर्स सुरुवातीला त्या व्यक्तीबद्दल गरजेची सर्व माहिती गोळी करतो. त्यानंतर ते टेलीकॉम ऑपरेटर एक्सिक्युटीव्हला आपल्या जाळ्यात ओढतात.

दोनदा सिम अॅक्टिव्हेट

त्यानंतर ते तुमच्या नावावर दोनदा सिम अॅक्टिव्हेट करतात त्यानंतर आरामात त्यांना ओटीपी मिळतो.

VIEW ALL

Read Next Story