Ford प्रमाणेच आणखी एक कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का 'या' कंपनीची कार?
ही कंपनी आहे निसान. या कंपनीकडून फार आधीच अनेक मॉडेल्सचं भारतासाठीचं प्रोडक्शन बंद करण्यात आलं आहे. सध्या भारतात या कंपनीची एकच कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ही कार म्हणजे निसान मॅग्नाईट. निसाननं आतापर्यंत माइक्रा, सनी, टेर्रानो, किक्स, डॅटसन गो, डॅटसन गो+ आणि डॅटसन रेडी गोची भारतातील विक्री बंद केली आहे. काही कारचे अपडेटेड मॉडेलही कंपनीनं लाँच केलेले नाहीत.
फक्त मॅग्नाईटचेच मॉडेल कंपनीकडून उपलब्ध करून दिले जात असून, अप्रत्यक्षरित्या भारतातील गाशा गुंडाळण्याच्याच दृष्टीनं आपण चाललो आहोत असा संदेशच जणू कंपनी देत आहे.
निसाननं आतापर्यंत विविध कारणांनी भारतात आपण तग धरण्यासाठी सक्षम आहोत अशीच भूमिका मांडली असली तरीही ग्लोबली लाँच होणारे मॉडेल भारतात मात्र लाँच करण्यासाठी कंपनीचं दुमत दिसत आहे.
मॉडेल दाखवूनही लाँच न करण्यामागं कंपनीचाच फायदा असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या माध्यमातून आपण भारतीय बाजारपेठेत टिकून आहोत असं कंपनी भासवतेय
दुसरं कारण म्हणजे डिलरशिपला मिळणाला दिलासा. कारण, कंपनीचा एकंदर व्यवहार पाहता जिथं तणावाचं वातावरण आहे तिथं कंपनी इतक्यात काही भारतातून माघार घेत नाही असाच त्यांचा समज होत आहे.