अॅपल कंपनीने Apple Pencil लाँच केली आहे. यात अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यूजर्सना USB Type C चार्जिंगसह अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत.
Apple Pencilची किंमत 7.900 रुपये इतकी आहे. तर, Apple च्या 2nd-gen Pencilची किंमत 11,900 रुपये इतकी आहे. ही पेन्सिल Ipadला सपोर्ट करते.
आयपॅडवर या पेन्सिलने नोट्स, ड्रोइंग आणि तुमच्या हस्ताक्षरात लिहूदेखील शकता. त्याव्यतिरिक्त यात अनेक फिचर्स आहेत.
यात युजर्सना स्लायडिंग कॅपदेखील मिळेल. तसंच, त्याखालील USB-C port फिट करण्यात आले आहे. या मदतीने तुम्ही पेन्सिल चार्ज करु शकतात आणि कंपेटेबल डिव्हाइसच्या मदतीने पेअरिंग करु शकता.
युजर्सना Apple Pencil वेगळी खरेदी करावी लागणार आहे. भारतात नोव्हेंबरमध्ये या पेन्सिलची विक्री नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. यात स्लाइडिंग कॅपसह USB-C पोर्टदेखील देण्यात आला आहे.
Apple Education Scheme अंतर्गंत ही Apple Pencilवर डिस्काउंट देण्यात येण्याचा प्लान बनवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ही पेन्सिल 6,900 रुपयांत मिळणार आहे.