'...म्हणून महिलांचं Extra Marital Affairs असतात',
जोडप्याचे वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात प्रेमासोबत रोमान्स असणं महत्त्वच आहे. अन्यथा नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असतं. पण एका सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यानुसार महिलांचं विवाहबाह्य संबंधामागील कारणं समजली आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. पार्टनरमधील एकानेही घराबाहेर पाऊल ठेवलं की लग्नाच्या पवित्र नात्याला तडा जातो.
नुकताच एका सर्व्हेनुसार महिला विवाहबाह्य संबंधात का अडकतात? यांचं कारण समोर आलं आहे. 5 लाखांहून अधिक यूजर्स असलेल्या ग्लीडन अॅपने विवाहित महिलांवर हा सर्व्हे केला आहे.
या अभ्यासातून असं लक्षात आलं की, बहुतेक महिलांचं विवाहबाह्य संबंध जोडीदाराच्या वागण्यामुळे झाले आहेत. भारतातील 10 पैकी 7 महिला पतीची फसवणूक करत आहेत.
या सर्व्हेनुसार पती पत्नींना घरातील कामात मदत करत नाहीत, म्हणून त्या घराबाहेर संबंध ठेवत आहेत.
तर काही महिला वैवाहिक जीवनाला कंटाळल्यामुळे दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात.
तर 37% स्त्रिया या काहीतरी नवीन करायचं असतं आणि त्यांना त्यांचे सुरु असलेले संबंध देखील सुधारायचं असतं म्हणून त्या विवाहबाह्य संबंध ठेवतात.