9 लाखापेक्षा कमी किंमत, 25KM मायलेज, 10 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' एसयुव्ही

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून एसयुव्हीची मागणी प्रचंड वाढली आहे.

आर्थिक वर्षात एसयुव्हीच्या विक्रीत मारुती सुझुकीने टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकलं आहे.

मारुती सुझुकीच्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये फार गाड्या नाहीत. पण त्यांच्या Brezza ला चांगली पसंती मिळाली आहे.

त्यातच Maruti Brezza ने विक्रीत आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या एसयुव्हीच्या एकूण 10 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.

8 महिन्यांपूर्वी या कारच्या 9 लाख युनिट्सची विक्री झाली होती. पण आता तिने सगळ्यांना मागे टाकत 10 लाखांचा टप्पा गाठला आहे.

रिपोर्टनुसार, मार्च 2016 मध्ये लाँच झाल्यापासून ते नोव्हेंबर 2023 च्या अखेरपर्यंत ब्रेझाच्या 9,96,608 युनिट्सची विक्री झाल्याचा अंदाज आहे.

2016 मध्ये मारुती सुझुकीने विटारा ब्रेझाच्या नावे फर्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केलं होतं. यानंतर विटारा हटवत ती नव्याने लाँच करण्यात आली होती.

मारुतीच्या या कारने टाटाच्या नेक्सॉनला मागे टाकलं आहे. कंपनी दर महिन्याला जवळपास 13 ते 15 हजार युनिट्सची विक्री करत आहे.

मारुती ब्रेझाची किंमत 8.29 लाख आहे. ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus अशा चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

या कारचं पेट्रोल व्हेरियंट 17 किमी तर सीएनजी व्हेरियंट 25 किमीचं मायलेज देतं.

VIEW ALL

Read Next Story