जास्त आसनक्षमता आणि जागा असणाऱ्या कारला एमपीव्ही सेगमेंटमध्ये अव्वल मानलं जातं. या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि इनोव्हा सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.
पण 2023 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारने या दिग्गजांना मागे टाकलं आहे आणि बेस्ट सेलिंग एमपीव्ही ठरली आहे.
Maruti Eeco फक्त 5.27 लाखांमध्ये उपलब्ध असून 5 आणि 7 सीटर दोन्हीत उपलब्ध आहे.
रिपोर्टनुसार, मारुती इकोच्या एकूण 1 लाख 36 हजार 010 युनिट्सची विक्री झाली आहे. जी 2022 मध्ये विक्री झालेल्या 1 लाख 25 हजार 74 युनिट्सच्या तुलनेत 9 टक्के जास्त आहे.
तर Maruti Ertiga दुसरी सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. कंपनीने एकूण 1 लाख 29 हजार 968 युनिट्सची विक्री केली आहे.
तिसऱ्या स्थानी Toyota Innova आहे. या एमपीव्हीने 2023 मध्ये 49 टक्के वाढीसह 80 हजार 73 युनिट्सची विक्री केली आहे.
मारुती इको फक्त खासगीच नाही तर व्यावसायिक कारणासाठी वापरु शकत असल्याने तिला पसंती मिळत आहे.
2010 मध्ये कारला पहिल्यांदा लाँच करण्यात आलं होतं. तेव्हापासून या कारच्या 10 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
मारुती इकोचे 5 आणि 7 सीटरमध्ये एकूण 13 व्हेरियंट आहेत. यामध्ये कार्गो, एंबुलन्स आणि टूअर व्हेरियंटचा समावेश आहे.
पेट्रोल मोडमध्ये ही कार 19.71 किमी प्रतीलीटर मायलेज देते. तर सीएनजी व्हर्जनमध्ये 26.78 किमी प्रती ग्रॅम मायलेज देते.