जर तुम्ही SUV घेण्याचा विचार करत असाल तर सध्या मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घ्या जबरदस्त फिचर्ससह येणाऱ्या 6 लाखांपर्यंतच्या या SUV
Tata Motors ची सर्वात स्वस्त SUV म्हणून Tata Punch हा चांगला पर्याय आहे.
ही देशातील सर्वात स्वस्त SUV पैकी एक आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळालं आहे.
या कारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल, ऑटो एअर कंडिशनर, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, स्वयंचलित हेडलाइट्स आणि क्रूझ कंट्रोल असे फिचर्स आहेत.
ही कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन 86PS ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करते.
एकूण चार व्हेरियंट्समध्ये मिळणाऱ्या या कारची किंमत 6 लाखापासून ते 9.52 लाख रुपयांपर्यंत आहे.
या यादीतील पुढील नाव निसान मॅग्नाईटचं आहे. एकूण 6 ट्रीममध्ये मिळणारी ही कार स्वस्त SUV मध्ये चांगला पर्याय आहे.
या कारमध्ये 1 लीटर नॅच्युरल एक्स्पायर्ड (72PS ची पॉवर आणि 69Nm चा टॉर्क) आणि 1 लीटर क्षमतेच्या टर्बे पेट्रोल इंजिनचा (100PS ची पॉवर आणि 160Nm चा टॉर्क) वापर करण्यात आला आहे.
यामध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, 7 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 16 इंचाचा ड्युअल टोन एलॉय, LED हेडलाइट्स आणि टाइम रनिंग लाइट्स मिळतात.
सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, 360 डिग्री कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी असे फिचर्स आहेत.
या कारची किंमत 6 लाखांपासून ते 11 लाख 2 हजारांपर्यंत आहे.
रेनॉल्टची Kiger स्वस्त एसयुव्ही आपल्या खास स्पोर्टी लूकसाठी प्रसिद्ध आहे. या SUV ची किंमत 6 लाख 50 हजार ते 11 लाख 23 हजारांपर्यंत आहे.
एकूण पाच व्हेरियंटमध्ये येणाऱ्या या SUV मध्ये त्याच इंजिनचा वापर करण्यात आला आहे जे निसान मॅग्नाईटमध्ये वापरण्यात आलं आहे.
या SUV मध्ये तुम्हाला 405 लीटरच्या बूट स्पेससह तीन ड्रायव्हिंग मोड्स मिळतात, ज्यामध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स मोड आहे.
या कारमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, PM2.5 एअर फिल्टर डिस्ले मिळतो.
या कारमध्ये 4 एअरबॅग, एंट्री लॉक ब्रेकिंग सिस्टम, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, रिअर व्ह्यू कॅमेरा, रिअअर पार्किग सेन्सर्स असे फिचर्स मिळतात.