या टीप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील मात्र यासंदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला नक्की घ्या.
दोन वेळेच्या जेवणात 5 ते 6 तासांचं अंतर ठेवलं तर ओव्हरइटिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये किमान 5 ते 6 तासांचे अंतर ठेवावे.
अनेक लोकांबरोबर बसून जेवण करताना गप्पांऐवजी जेवणावर अधिक लक्ष द्यावे.
अनेक लोकांबरोबर बसून भोजन करत असताना आपलं लक्ष स्वत:च्या जेवणार ठेवा.
छोटे घास घेतल्याने अन्नाचं नीट पचन होतं आणि पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे सारखी भूक लागत नाही.
जेवताना मोठे मोठे घास घेणं टाळा. त्याऐवजी छोटे छोटे घास घ्या.
जेवणाच्या वेळा निश्चित नसतील तर ओव्हरइटिंगची सवय लागू शकते.
भूक लागल्यावरच जेवण करा. जेवणाच्या वेळा ठरवून घ्या.
योग्यरितीने अन्नाचे पचन झाले तर वारंवार भूक लागत नाही.
सावकाश चावून चावून अन्न सेवन करा. याने तोंडातील लाळ अन्नात मिसळून पचनास मदत होते.
जेव्हा जेव्हा भोजन करता तेव्हा सावकाश अन्न प्राशन करा.
जास्त आणि वारंवार पाणी प्यायल्याने कमी भूक लागते.
तुम्हाला ओव्हरइटिंगची सवय मोडायची असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिक पाणी प्या.
ओव्हरइटिंगमुळे वजन वाढणे, स्थूलपणा, आळस, प्रकृतीसंदर्भातील समस्यांसारख्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच आपण आज ओव्हरइटिंगची सवय मोडण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेणार आहोत.
गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करण्याला ओव्हरइटिंग असं म्हणतात. अनेकदा भूक लागलेली नसतानाही बरेच जण अन्न सेवन करताना दिसतात त्यांना ओव्हरइटिंगचा त्रास असतो असं म्हणता येईल.
ओव्हरइटिंगची सवय लागली असेल तर या टीप्स नक्की फॉलो करा