एका टचपासून दूर असेल तुमचं घर

Presence

जुना फोन घ्या आणि वाय-फायच्या मदतीने लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ डिव्हाइसमध्ये बदला. प्रेझेन्स हे पाळत ठेवण्याचे वैशिष्ट्य असलेले व्हिडिओ कॅमेरा अॅप आहे.

Presence कसं काम करतं?

यामध्ये (तुमचा फोन आणि घरी ठेवलेला फोन यांच्यात) व्हिडिओ-ऑडिओची देवाणघेवाण करता येते. अॅपमधील दोन कनेक्ट केलेल्या उपकरणांपैकी एक मॉनिटर आणि कॅमेरा म्हणून काम करतो.

Presenceचा उपयोग काय काय?

Presenceचा वापर करुन तु्म्ही दूर बसून ऑडिओ आणि व्हिडिओच्या मदतीने आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी कनेक्ट राहू शकता. व्हिडीओ कॉलसाठीही याचा वापर करता येणार आहे. अँड्रॉइड आणि iOS दोन्ही युजर्ससाठी हे अॅप आहे

iCamSpy

या अॅपच्या मदतीने घर किंवा कोणत्याही ठिकाणावर लक्ष ठेवणे शक्य आहे. मात्र यामध्ये दोन मोबाईल फोन ऐवजी एक मोबाईल आणि पीसी आवश्यक आहे.

iCamSpy कसं वापरायचं?

हे अॅप इंस्टॉल करा आणि पीसीवर iCamSpy.com वर लॉगिन करा. त्यानंतर मायक्रोफोन आणि वेबकॅमद्वारे तुमचे घर तुमच्या मोबाइल फोनशी जोडले जाईल.

मोशन डिटेक्शनमुळे वेळोवेळी अपडेट

यामध्ये तुम्हाला फक्त पाळत ठेवण्याची सुविधा मिळेल.मात्र यात मोशन डिटेक्शन वैशिष्ट्य आहे, जे तुम्हाला वेळावेळी अपडेट करेल. वाय-फाय नेटवर्कवरून त्याचा चांगला अनुभव घेता येईल.

Alfred

आल्फ्रेड हे Android सुरक्षा कॅमेरा अॅप आहे ज्याद्वारे दूरवरुन घर सुरक्षितत आहे की नाही याचे निरीक्षण करणे शक्य आहे.

Alfredसाठी लॉगिनची झंझट नाही

या अॅपचा इंटरफेस असा आहे की यामध्ये युजर साइन-अप आणि लॉगिनच्या कामामध्ये अडकत नाही.

स्मार्टफोनद्वारे वापरा Alfred

याद्वारे तुम्ही स्मार्टफोनला सुरक्षा कॅमेरामध्ये बदलू शकता. जुन्या स्मार्टफोनचा यापेक्षा चांगला वापर तुम्ही क्वचितच करू शकता

Salient Eye, Home Security Camera & Burglar Alarm

या अॅपच्या मदतीने जुना फोनदेखील सर्व्हिलन्स सिस्टिममध्ये बदलता येऊ शकतो. तुम्ही टॅबलेटवर अॅप सेट करू शकता आणि ते घरी सोडू शकता.

अॅपची वैशिष्ट्ये काय आहेत?

या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे ते मोशन डिटेक्ट करते. फोटोही रेकॉर्ड केले जातात. तुम्हाला ई-मेलद्वारे अलर्ट मिळतो. आपण ते फोटो डाउनलोड देखील करू शकता.

VIEW ALL

Read Next Story