ना धोनी ना पांड्या, 'हा' खेळाडू खरा कॅप्टन कूल

सुनील गावस्कर स्पष्टच म्हणाले...

कूलनेस

महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियाचा 'कॅप्टन कूल' म्हटलं जातं. तर धोनीनंतर आता हार्दिक पांड्या याच्या खेळात कूलनेस दिसून येतो, असं म्हटलं जातं.

लिटिल मास्टर

मात्र, टीम इंडियाचे माजी स्टार खेळाडू आणि लिटिल मास्टर ओळख असलेल्या सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

चेहऱ्यावरचं हास्य

संघातील खेळाडू जेव्हा झेल सोडतो किंवा चुकीचे क्षेत्ररक्षण करतो तेव्हा कर्णधाराच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याला 'ओरिजिनल कॅप्टन कूल' बनवतं, असं गावस्कर म्हणतात.

ओरिजिनल कॅप्टन कूल

कपिल देव एक असाच कर्णधार होता. माझ्या दृष्टीने कपिल देव हेच 'ओरिजिनल कॅप्टन कूल' आहेत, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.

व्हिव्हियन रिचर्ड्सचा एक झेल

वर्ल्ड कपमध्ये बॅट आणि बॉलसह कपिलची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने व्हिव्हियन रिचर्ड्सचा एक झेल घेतला ज्याने आम्हाला विश्वचषक ट्रॉफी मिळवून दिली, असंही गावस्कर म्हणतात.

वर्ल्ड कप

दरम्यान, 1983 च्या विश्वचषक विजयाच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गावस्कर यांनी हा खुलासा केला होता. 1983 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून जगाला ताकद दाखवून दिली होती.

VIEW ALL

Read Next Story