मुकेश अंबांनींच्या जिओला मोठ यश मिळालंय.
जिओ पेमेंट सॉल्यूशनला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.
त्यामुळे जियो पेमेंट आता ऑनलाइन पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून काम करेल.
जिओ पेमेंट आता मर्चंड आणि कस्टमरला डिजिटल व्यवहारांची सुविधा देणार आहे. हे पेटीएमप्रमाणेच काम करेल.
पेटीएम बॅंकवर आरबीआयची कारवाई सुरु असताना जिओला ही संधी मिळाली आहे.
त्यामुळे जिओ पेमेंट मार्केटमध्ये मोठा डेटाबेस तयार करु शकते.
जिओ पेमेंट बॅंक अंतर्गत बायमॅट्रीक, फिजिकल डेबिट कार्ड आणि डिजिटल सेव्हिंग अकाऊंटची सुविधा मिळते.
पेटीएम फास्टॅगचा मोठा युजरबेस मार्केटमध्ये होता. आरबीआयच्या निर्णयाने त्यांचा व्यवहार बंद करावा लागला.
त्यामुळे आता जिओदेखील आता फास्टॅग आणणार का? हे पाहावं लागणार आहे.
फास्टॅग एक डिजिटल टोल कलेक्शन सिस्टिम आहे. हे वाहनांच्या विंड स्क्रिनवर लावले जाते. यानंतर यातून ऑटोमॅटीक टोल पेमेंट केले जाते.