मागील दोन वर्षांमध्ये सोशल मीडियाचा चेहरामोहराच बदलला आहे. या माध्यमाताच वापर करत खऱ्या अर्थानं जग जवळ आलं आहे.
विविध विषयांवर विविध मुद्द्यांवर केल्या जाणाऱ्या पोस्ट, इन्फ्लुएन्सर आणि रिलस्टार ही मंडळी कमालीची चर्चेत आली आहेत.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ आणि त्याहूनही रील शेअर करण्यासाठी योग्य वेळ पाळली जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. तरच त्या कंटेंटला चांगला प्रतिसाद मिळतो.
रीलचं म्हणावं, तर ज्यावेळी इन्स्टाग्राम युजर्स अधिक प्रमाणात आणि अधिक वेळासाठी Active असतात त्या वेळी Reel शेअर करावं.
इन्स्टा युजर्स सर्वाधिक कोणत्या वेळी Active असतात हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम Insights/ Prrofessional Dashboard सेक्शनमध्ये जावं. इथं तुम्हाला अॅक्टिव्ह युजर्सची योग्य वेळ लक्षात येईल. त्याशिवाय तुम्हाला इथं पोस्ट आणि रीलसंदर्भातील माहितीसुद्धा मिळेल.
क्रिएटर किंवा बिझनेस अकाऊंट असल्यास तुम्हाला या गोष्टी पाहण्याची मुभा असते. राहिला प्रश्न रील शेअर करण्याच्या योग्य वेळेचा तर, रात्री 9 वाजता रील शेअर केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.