Honda ची मोठी खेळी! तब्बल 37 हजार कमी किंमतीत लाँच केली 300 CC बाईक

Honda CB300R

होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर ऑफ इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपली नवी Honda CB300R ला लाँच केलं आहे. कंपनीने नव्या इंजिनसह या बाईकला अपडेट केलं आहे.

किंमतीत मोठी घट

होंडाने या बाईकला फक्त अपडेट केलेलं नाही. तर किंमतीतही मोठी घट केली आहे. नव्या Honda CB300R ची सुरुवातीची किंमत 2 लाख 40 हजार रुपये ठरवण्यात आली आहे.

37 हजारांनी स्वस्त

Honda CB300R ची किंमत आधीच्या तुलनेत 37 हजारांनी कमी करण्यात आली आहे. ही बाईक बाजारात असणाऱ्या ट्रायंप स्पीड आणि टीव्हीएस अपाचेला स्पर्धा देत आहे.

सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन

होंडाने या बाईकमध्ये नव्या रिअल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्सअंतर्गत डेव्हलप करण्यात आलेल्या 286 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिनचा वापर केला आहे. जे 31hp ची पॉवर आणि 27.5NM चा टॉर्क जनरेट करते.

6 स्पीड गेअरबॉक्स

या इंजिनला 6 स्पीड गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. याचं एकूण वजन 146 किलो आहे.

इमर्जन्सी ब्रेक लाइट सिस्टम

Honda CB300R मध्ये इमर्जन्सी ब्रेक लाइट सिस्टमचा वापर केला आहे. एखाद्या आपातकालीन स्थितीत जोरात ब्रेक दाबल्यास टर्न सिग्नल फ्लॅश होतात. सुरक्षेच्या दृष्टीने हे फिचर फार उपयोगी आहे.

ड्युअल चॅनेल अँटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम

या बाईकमध्ये 41 मिमी फ्रंट अप-साइड-डाऊन फॉर्क सस्पेंशन आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आलं आहे. यामध्ये ड्युअल चॅनेल अँटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.

असिस्ट स्लीपर क्लच

या बाईकमध्ये असिस्ट स्लीपर क्लचही देण्यात आला आहे. जो सहजपणे गेअर बदलण्यात करतो, तसंच डिएक्सलरेशनदरम्यान गेअर बदलल्यास मागील चाकाला लॉक होण्यापासून वाचवतं.

VIEW ALL

Read Next Story