नवे पिक्सल होणार लाँच

Google पुन्हा एकदा आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सला लाँच करणार आहे. कंपनी Pixel 8 आणि Pixel 8 Pro ला पुढील महिन्यात 4 ऑक्टोबरला लाँच करण्याची शक्यता आहे.

iPhone ही होणार लाँच

तसंच या महिन्यात Apple आपले नवे iPhone लाँच करणार आहे. कंपनी iPhone 15 सीरिजला लाँच करणार आहे. हा iPhone टाइप सी चार्जरला सपोर्ट करणारा असणार आहे.

Google ने उडवली खिल्ली

गुगलने एका व्हिडीओ iPhone ची खिल्ली उडवली आहे. युट्यूबला ही सीरिज दोन महिन्यांपूर्वी सुरु झाली होती. ज्यामध्ये गुगल त्या फिचर्सबद्दल सांगत आहे जे iOS वर मिळत नाहीत.

टाइप-सी चार्जरचा मुद्दा उचलला

या व्हिडीओत त्या फिचर्सबद्दलही सांगण्यात आलं आहे, जे आता iPhone वर मिळणार आहे. असंच एक फिचर म्हणजे USB Type C पोर्ट आहे.

टाइप-सी पोर्ट

युरोपिअन युनिअनच्या निर्णयानंतर iPhone मध्ये अखेर USB Type-C पोर्ट मिळणार आहे.

Pixel, iPhone आणि Spa

युट्यूब व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की, iPhone आणि Pixel एका स्पामध्ये आराम करताना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये iPhone आपल्या तुलनेत Pixel आणि इतर अँड्रॉईडमध्ये जास्त फिचर्स मिळत असल्याचं सांगतो.

iPhone वर मिळत नाहीत हे फिचर्स

तसंच iPhone व्हिडीओत फोटोला अनब्लर करणं, AI कॉल आन्सरिंग आणि दुसऱे फिचर्सबद्दलही सांगतो. यासह iPhone मध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळण्याबद्दलही सांगतो.

USB-C पोर्टवर संपते चर्चा

iPhone मध्ये अखेर USB Type-C चार्जिंग पोर्ट मिळत आहे, या मुद्द्यावर ही चर्चा संपते. हे फिचर iPhone युजर्ससाठी मोठं अपग्रेड आहे.

iPhone 15 Ultra होणार लाँच

कंपनी यावेळी फक्त टाइप-सी चार्जिंग पोर्ट देणार नाही. तर एक नवा Ultra व्हेरियंटही लाँच करु शकते. ज्यामध्ये अनेक आकर्षक फिचर्स असतील.

VIEW ALL

Read Next Story