हॉटेलच्या रुममध्ये असून शकतो हिडन कॅमेरा, गर्लफ्रेंड किंवा पत्नीसोबत स्टे करण्याआठी करा 'हे' काम

Diksha Patil
Jul 15,2023

हिडन कॅमेरा शोधा

जेव्हा तुम्ही हॉटेलची रूम घेता तेव्हा सगळ्यात आधी हिडन कॅमेरा कुठे आहे का ते तपासा. रुममधले सगळ्या खिडक्या बंद करा, लाइट्स बंद कर आणि दरवाजे सगळं बंद करा. काळोखात फोनच्या फ्लॅशमध्ये काना कोपऱ्यात कॅमेरा आहे का ते तपासा.

लपण्याची सामान्य ठिकाणे

भिंतीवरील घड्याळे, स्मोक डिटेक्टर, पिक्चर फ्रेम, दिवे, टेडी बेअर किंवा अगदी रोपांची कुंडी यांसारख्या वस्तूंची तपासणी करा.

बाथरूम

बाथरूममध्ये छुपे कॅमेरे असण्याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही ते तपासण्यासारखे आहे. एअर फ्रेशनर, शॉवरहेड्स, टॉवेल रॅक किंवा सजावटीच्या वस्तू असलेल्या जागा तपासून पहा.

फोनच्या कॅमेऱ्यानं तपासा

कॅमेरा चालू करून खोलीतील प्रत्येक वस्तू तपासा.

मोबाइल ब्लूटूथ चालू करा

रिपोर्ट्सनुसार, काही हॉटेल रूमचे कॅमेरे ब्लूटूथद्वारे ऑपरेट केले जातात. तुम्हाला हॉटेलच्या खोलीबद्दल काही शंका असल्यास, तुमच्या मोबाइल फोनवर ब्लूटूथ चालू करा आणि कोणतीही असामान्य उपकरणे किंवा कनेक्शन तपासा.

गरज नसताना कुठे वायर आहे का?

अनावश्यक किंवा गरज नसताना वाटणाऱ्या कोणत्याही ठिकाणी वायर दिसल्यास तिथे तपासून पाहा.

प्रत्येत हॉटेलच्या रुममध्ये नसतात कॅमेरे

हॉटेलच्या प्रत्येक खोलीत छुपे कॅमेरे असण्याची शक्यता नाही. बहुतेक हॉटेल अतिथींची सुरक्षा आणि प्रायव्हसीला प्राधान्य देतात.

(All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story