स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट

Flipkart आणि Amazon वर 8 ऑक्टोबरपासून सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट दिला जात आहे.

काही स्मार्टफोन खरेदी करणं टाळा

या सेलमध्ये असे अनेक स्मार्टफोन आहेत, ज्यांना फार हाइप करुन विकलं जात आहे. यामधील काही फोन जुने झाले असून, काही व्हॅल्यू फॉर मनी श्रेणीत येत नाहीत.

का खरेदी करु नये?

या यादीत जवळपास सर्वच ब्रँण्डचे फोन आहेत. हे स्मार्टफोन खरेदी करण्याऐवजी तुम्ही त्या किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करु शकता.

Apple iPhone

iPhone हा कोणत्याही सेलमध्ये सर्वाधिक लक्ष असलेला स्मार्टफोन असतो. जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर iPhone 12 किंवा त्यापेक्षा कमीचा घेऊ नका. तुम्ही iPhone 13 किंवा 14 खरेदी करु शकता.

OnePlus

या सेलमध्ये OnePlus च्या फोनवरही ऑफर मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही OnePlus 11 सीरिज आणि लेटेस्ट नॉर्ड स्मार्टफोन्सवर लक्ष केंद्री करु शकता. जुने नॉर्ड फोन खरेदी करु नका.

Samsung

सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर मिळणार आहे. Galaxy Z Flip 3 वरही ऑफऱ आहे, पण तो खरेदी करु नका. कारण हा फोन आता जुना झाला आहे.

Realme

Realme चा स्मार्टफोन खरेदी करतानाही विचार करा. स्वस्तच्या नादात जुना किंवा कमी स्पेस असणारा मोबाईल खरेदी करु नका.

Razr 40 Ultra

Motorola च्या सर्व मोबाईलवर ऑफर आहे. पण Razr 40 Ultra खरेदी करणार असाल तर थांबा. यापेक्षी चांगली डील तुम्हाला Galaxy Z Flip 5 वर मिळेल.

Redmi Note 12 4G

Xiamo ने मागील काही काळात चांगला फोन लाँच केलेला नाही. पण Redmi Note 12 4G पेक्षा तुम्ही 5G व्हर्जन किंवा Redmi Note 12 5G खरेदी करु शकता.

Oppo

Oppo च्याही सर्व फोनवर ऑफर आहे. पण सेलमध्ये फार चांगला फोन उपलब्ध नाही. त्यामुळे एका वर्षापेक्षा जास्त जुना फोन खरेदी करु नका.

Vivo

Oppo प्रमाणे Vivo चीदेखील स्थिती आहे. या कंपनीचेही एका वर्षापेक्षा जास्त जुने फोन खरेदी करु नका. लेटेस्ट फोनवरच लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

Phone 1

Nothing चे दोन्ही फोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अशामध्ये तुम्ही Phone 2 वर लक्ष्य केंद्रीत केलं पाहिजे. कारण Phone 1 आता एक वर्ष जुना झाला आहे. त्यामुळे Phone 2 चांगला पर्याय आहे.

VIEW ALL

Read Next Story