काही कार आणि बाईक्सच्या नंबर प्लेटवर फक्त A/F का लिहिलेलं असतं?

बाईक असो अथवा कार A/F दिसतेच

बाईक असो किंवा कार असो अनेक नव्या गाड्यांवर A/F अशी अक्षरं नंबर प्लेटवर लिहिलेली दिसून येतात.

पोलीस अशा गाड्यांना थांबवत नाहीत

या अशा गाड्यांना नंबर नसतानाही पोलीस सामान्यपणे आडवत नाहीत. नवीन गाड्यांवर नंबर प्लेटवर नंबरऐवजी A/F का लिहिलेलं असतं तुम्हाला ठाऊक आहे का?

99 टक्के लोकांना कल्पनाच नाही

खरं तर 99 टक्के लोकांना नवीन गाड्यांच्या नंबर प्लेटवर A/F का लिहिलेलं असतं हे ठाऊक नसतं. याच A/F चा अर्थ काय, ते का लिहितात हे आपण आज जाणून घेऊयात...

A/F चा अर्थ काय?

गाड्यांच्या ब्लँक नंबर प्लेटवर लिहिलेल्या A/F चा अर्थ असतो Applied For! म्हणजेच वाहनाच्या मालकाने वाहनाच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केला आहे असा या A/F चा अर्थ होतो.

वाहनं चालवण्याची परवानगी

जोपर्यंत स्थानिक परिवहन कार्यालयाकडे नवीन वाहनाची नोंद होत नाही आणि या वाहनांना कायम स्वरुपी क्रमांक मिळत नाही तोपर्यंत A/F लिहिलेली प्लेट लावून वाहनं चालवण्याची परवानगी असते.

A/F लिहून वाहनं चालवण्यास काळमर्यादेचं बंधन

कायद्यानुसार, एका आठवड्याहून अधिक कालावधीसाठी A/F लिहिलेली दुचाकी अथवा कार चालवता येत नाही. एका आठवड्यात कायम स्वरुपी क्रमांक मिळवणं बंधनकारक असतं.

तातडीने A/F लिहिलेली पाटी काढावी

स्थानिक आरटीओकडून कायमस्वरुपी क्रमांक म्हणजेच नंबर मिळाल्यानंतर A/F लिहिलेली वाहनं चालवणं कायद्याने गुन्हा असतो. त्यामुळेच आरटीओकडून क्रमांक मिळाल्यावर तो तातडीने गाडीवर लावून घेणं फायद्याचं ठरतं.

VIEW ALL

Read Next Story