नवीन वर्षात कार खरेदी करणे महाग होऊ शकते. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
लक्झरी कार सेगमेंटसाठी हे वर्ष आतापर्यंत खूप चांगले गेले असून या श्रेणीतील वाहन कंपन्या आता पुढील वर्षासाठी किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.
जर्मनीच्या लक्झरी कार कंपनी ऑडी आणि बीएडब्ल्यू कंपनीने जानेवारीपासून आपल्या सर्व कारच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे सांगितले. मर्सिडीज-बेंझ इंडियानेही जानेवारीपासून किंमती वाढविण्याचा विचार केला आहे.
वस्तूंच्या वाढत्या किमती आणि महागाईचा ताण यामुळे वाढलेल्या खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी कार कंपन्या जानेवारीपासून किमती वाढवत आहेत.
ह्युंदय देखील पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये तिच्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवणार आहे. टाटा मोटर्स, मारुती, महिंद्रा नंतर आता ह्युंदनेही आपल्या मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकीने यावर्षी तिसऱ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 16 जानेवारी, 1 एप्रिल रोजी सर्व मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमती वाढवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, डिसेंबरमध्येही विक्रीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. ज्या वाहनांचा विक्री न झालेला साठा डीलर्सकडे पडून आहे अशा वाहनांवरही सवलत दिली जात आहे. पण एसयूव्हीवर कोणतीही सूट दिली जाणार नाही.