Apple च्या लेटेस्ट सीरिजमध्ये iPhone 15 आहे. जर तुम्ही हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. फक्त 44 हजार 900 रुपयांत हा मोबाईल तुम्ही खरेदी करु शकता.
indiaistore वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी अनेक ऑफर आहेत. अशात जास्तीत जास्त सूट मिळवू शकता.
iPhone 15 (128GB) ची किंमत 79 हजार 900 रुपये आहे. यावर 5 हजारांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय 4 हजारांची इंस्टंट कॅशबॅक आहे. अशात किंमत 70 हजार 900 होते.
याशिवाय एक्स्चेंज केल्यास 20 हजारांपर्यंत किंमत कमी होईल. तसंच 6 हजारांपर्यंतचा एक्स्चेंज बोनसही मिळेल. अशात किंमत 44 हजार 900 रुपये होईल.
iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा Super Rectina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो HDR10, Dolby Vision ला सपोर्ट करतं. यात 1000 Nits पीक ब्राइटनेस मिळतो.
iPhone 15 मध्ये Apple A16 Bionic (4nm) चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा Apple GPU (5-Core Graphics) सह येतो. यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतो.
iPhone 15 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे, जो OIS सह येतो. तसंच 12MP चा सेकंडरी कॅमेरा आहे.
iPhone 15 मध्ये 12MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. f/1.9 चा एपर्चर आहे. यात HDR, Cinematic Mode मोड देण्यात आले आहेत.
iPhone 15 मध्ये 3349mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये 4.5W चं रिव्हर्स चार्जिंगही आहे.