आयपीएल 2024 आधी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. दिल्लीचा स्टार खेळाडू ऋषभ पंत IPL खेळण्यासाठी सज्ज झालाय.

बीसीसाआयने ऋषभ पंतला फिटनेस सर्टिफिकेट दिलं आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांनी ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

30 डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा रस्ते अपघात झाला होता. गंभीर दुखापतीमुळे पंत तब्बल 14 महिने क्रिकेटपासून दूर होता.

आयपीएलआधी ऋषभ पंत नव्या लूकमध्ये दिसला आहे. डोक्यावर फेटा आणि पंजाबी कपडे परिधान केलेला ऋषभ पंतचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वास्तविक ऋषभ पंत आयपीएल ब्रॉडकास्टरसाठी एक जाहीरात करतोय. यात त्याने पंजाबी व्यक्तीरेखा साकारली आहे.

ऋषभ पंतचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्समधून ऋषभ पंत फलंदाज आणि विकेटकिपर अशी दुहेरी भूमिका पार पाडताना दिसणार आहे. टी20 विश्वचषकातही पंतची खेळण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story