Ather ची इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 20 हजारांनी झाली स्वस्त, किंमत फक्त....
Jan 11,2024
एथर एनर्जीने गतवर्षी बाजारात आपलं स्वस्त मॉडेल Ather 450S ला लाँच केलं होतं. त्यात आता कंपनीने किंमत आणखी कमी केली आहे.
जर तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी आहे. कंपनीने किंमत 20 हजारांनी कमी केली आहे.
Ather 450S च्या किंमतीत घट केल्यानंतर आता या स्कूटरची किंमत बंगळुरुत 1.9 लाख रुपये आणि दिल्लीत 97 हजार 500 रुपये झाली आहे.
ऑनरोड किंमतीबद्दल बोलायचं गेल्यास बंगळुरुत ही स्कूटर 1.17 लाख आणि दिल्लीत जवळपास 1.5 लाखापर्यंत जाते. यात रजिस्ट्रेशन आणि विमा यांचा समावेश आहे.
नवी Ather 450S सिंगल चार्जमध्ये 115 किमीच्या IDC रेंजसह येते. हिचा टॉप स्पीड ताशी 90 किमी आहे. ही स्कूटर 3.9 सेकंदात 0 ते 40 किमी वेग पकडण्यात सक्षम आहे.
Ather 450S मध्ये कंपनी 3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देत आहे. यामध्ये 6.4 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. जी 8.58 bhp ची पॉवर आणि 26 Nm चा टॉर्क जनरेट करते.
या स्कूटरमध्ये 7 इंचाचा डिपव्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्कूटरला चार्ज करण्यासाठी 6 तास 36 मिनिटांचा वेळ लागतो.
सुरक्षेसाठी कंपनीने स्कूटर खाली पडल्यास तात्काळ पॉवर ऑफ होण्याची सुविधा दिली आहे.
याशिवाय पार्क असिस्ट, ऑटो होल्ड, 22 लीटरचा बूट स्पेस, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.