बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट

करणच्या टॉक शोमध्ये गप्पा-टप्पांच्या सत्राला यावेळी चार चाँद लावले झीनत अमान आणि नीतू कपूर यांनी. या दोघींनी यावेळी अनेक मुद्द्यांवर मोकळेपणानं आपली मतं मांडली.

कुटुंबात गोड भांडणं...

नीतू कपूर यांनी टॉक शो दरम्यान, राहा पहिल्यांदा कोणता शब्द उच्चारणार यावरून कुटुंबात हलकीफुलकी आणि विनोदी वाद होतात असं सांगितलं.

वैवाहिक आयुष्यासाठी सल्ले

नीतू कपूर यांनी यावेळी रणबीर आणि आलियाच्या वैवाहिक नात्यावरही भाष्य केलं. प्रत्येक पिढीमध्ये दिसणारा फरक आणि नव्या जोडप्यांच्या विचारसणीमध्ये दिसणारा फरक त्यांनी अधोरेखित केला आणि या जोडीला हाच सल्लाही दिला.

बायोपिक

बायोपिक अर्थात झीनत अमान यांनी आपल्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रानं मध्यवर्ती भूमिका साकारल्यास अधिक आवडेल असं रॅपिड फायर राऊंडमध्ये सांगितलं.

प्रसिद्धी, नैराश्य

प्रसिद्धीची बदलणारी रुपं पाहता स्वत:ची किंमत ओळखून भान राखावं, असं झीनत अमान म्हणाल्या. यावेळी त्यांनी प्रसिद्धी, नैराश्य या मुद्द्यांवरही भाष्य केलं.

पापाराझींचा राग का येतो?

जया बच्चन पापाराझींवर का चिडतात असा प्रश्न विचारला असता ते छायाचित्रकार आणि जया बच्चन यांच्यातलं एक सुरेख नातं आहे, असं म्हणत त्यांनी गप्पांना एक हास्यमय वळण दिलं.

पतीच्या आठवणी

नीतू कपूर यांनी या टॉक शोदरम्यान पती ऋषी कपूर यांचा कॅन्सरशी असणारा संघर्ष आणि त्यातही अखेरच्या दिवसांमध्ये त्यांचं कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणं मन:स्पर्शी असल्याचं सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story