गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काही दिवसातच 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयजयकाराने आसमंत दणाणेल. भक्त बाप्पाच्या आराधनेत मग्न होतील.

पण कधी तुम्ही विचार केलाय, की 'गणपती बाप्पा मोरया' म्हणण्याची सुरुवात कुठून झाली?

3ही कहाणी एका भक्ताची आहे ज्याचे नाव कायमस्वरूपी त्याच्या आराध्याशी जोडले गेले. गणपती बाप्पाच्या जयजयकाराची ही अनोखी गोष्ट जाणून घेऊ.

महाराष्ट्रातील पुणे जिल्हयापासून 21 किमी लांब चिंचवड नावाचे गाव आहे.

या चिंचवड गावी एक अशा संताचा जन्म झाला ज्याच्या बाप्पावरील भक्ति आणि आस्थेने परमोच्च सीमा गाठली. आणि त्यानंतर कायमस्वरूपी त्याचे नाव बाप्पाशी जोडले गेले.

पंधराव्या शतकात एक संत होऊन गेले ज्यांचे नाव 'मोरया गोसावी'. असे म्हंटले जाते की गणेशाच्या आशीर्वादानेच मोरया गोसावीचा जन्म झाला होता.

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशाची पूजा कारण्यासाठी मोरया चिंचवड ते मोरगाव पायी जात असत.

नंतर वाढत्या वयामुळे त्यांना हे करणे शक्य होईना. त्यामुळे एके दिवशी स्वतः गणपती बाप्पांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की गणपतीची मूर्ती त्यांना नदीत मिळेल.

दुसऱ्या दिवशी अगदी तसेच झाले. स्नान करण्यासाठी गेलेल्या मोरया गोसावींना नदीत गणपतीची मूर्ती सापडली.

तेव्हापासून भक्त चिंचवड गावी मोरया गोसावींच्या दर्शनासाठी येऊ लागले. असे म्हणतात की भक्त गोसावींचे पाय धरून मोरया असे म्हणत आणि संत मोरया त्यांच्या भक्तांना मंगलमूर्ती म्हणत असत.

भक्तांचे प्रेम आणि गणपतीच्या आशीर्वादामुळे लोक आजपर्यंत गणपतीच्या आधी मोरयांची आठवण काढतात.

VIEW ALL

Read Next Story