Apple ची बंपर ऑफर, iPad तब्बल 9 हजारांनी झाला स्वस्त; जाणून घ्या नवी किंमत

Oct 19,2023

Apple iPad झाला स्वस्त

Apple ने Apple 10th-gen iPad ची किंमत कमी केली आहे. या iPad मध्ये 10.9 इंचाचा लिक्विड रेटीने डिस्प्ले आहे.

गेल्यावर्षी केला होता लाँच

Apple 10th-gen iPad ला गतवर्षी लाँच केलं होतं, तेव्हा त्याची किंमत 44 हजार 900 रुपये आणि Wi-Fi + Cellular मॉडेल्सची किंमत 59 हजार 900 रुपये होती.

डिस्काऊंनंतरची किंमत किती?

Apple 10th-gen iPad ची सुरुवातीची किंमत आता 39 हजार 900 रुपये आहे. म्हणजेच हा 5 हजारांनी स्वस्त झाला आहे.

इंस्टंट कॅशबॅक

Apple 10th-gen iPad वर इंस्टंट कॅशबॅकही मिळत आहे, जो 4 हजारांचा आहे. हा कॅशबॅक Apple च्या फेस्टिव्ह सीझनचा भाग आहे. त्यामुळे युजर्स 35 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

या iPad च्या किंमतीत बदल नाही

Apple ने iPad Pro, iPad Air आणि 9th-gen iPad च्या किंमती कमी केलेल्या नाहीत. अशामध्ये 10th-gen iPad ची सुरुवातीची किंमत आणि 9th-gen iPad च्या किंमतीत फक्त 3 हजारांचं अंतर आहे.

iPad 10th-gen चे फिचर्स

Apple 10th-gen iPad मध्ये 10.9 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत हा डिस्प्ले 0.7 इंच मोठा आहे. लेटेस्ट मॉडेल अधिक ठळक आणि शार्प डिझाइनसह येतात.

A14 Bionic चिप

Apple iPad 10th-gen मध्ये A14 Bionic चिपसेट वापरण्यात आला आहे, जो iPhone 12 मध्येही आहे. हा एक पॉवरफूल प्रोसेसर आहे.

कॅमेरा

Apple iPad 10th-gen मध्ये 12MP चा अल्ट्रा वाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये सेंटर स्टेज नावाचं एक फिचर आहे, जे तुम्ही हालचाल करत असलात तरी तुम्हाला सेंटर फ्रेममध्ये ठेवतं. 12MP चा रेअर कॅमेरही आहे.

VIEW ALL

Read Next Story