भारतात लवकरच येणार Flying Taxi, आनंद महिंद्रांनी दाखवली झलक

भारतात लवकरच हवेत उडणारी टॅक्सी दिसणार आहे. आनंद महिंद्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी एक्सवर इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सीच्या प्रोटोटाइपचे काही फोटो शेअर केले आहेत.

आयआयटी मद्रासच्या मदतीने कंपनी फ्लाईंग इलेक्ट्रिक टॅक्सीवर काम करत आहे. पुढील वर्षी ही सादर केली जाईल असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे.

आयआयटी मद्रास जगातील सर्वात एक्सायटिंग आणि अॅक्टिव्ह इनक्युबेटरपैकी एक झालं आहे. त्यामुळे आता आपल्या देशात इनोवेटर्सची कमतरता आहे असं पाहिलं जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले आहेत.

या फ्लाईंग टॅक्सीची निर्मिती ePlane नावाची कंपनी करत आहे, जी आयआयटी मद्रासशी इनक्युबेटेड आहे.

या एअर टॅक्सीत 200 किलो वजन उचलण्याची क्षमता असेल आणि 2 लोकांच्या बसण्याची व्यवस्था असेल.

कंपनीने अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कारने ज्या प्रवासाला 60 मिनिटं लागतात तो प्रवास एअर टॅक्सीने 14 मिनिटांत पूर्ण होईल.

ही एक पूर्णपणे इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग टॅक्सी असेल. ही टॅक्सी फक्त वेळच वाचवणार नाही तर परवडणारीही असेल असं कंपनीचं म्हणणं आहे.

ePlane कंपनीत वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांची टीम काम करत आहे. रोजचा प्रवास सहज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

VIEW ALL

Read Next Story