किंमत फक्त 4.69 लाख; Renault ने लाँच केली सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

फ्रान्सची प्रमुख कार निर्माता कंपनी Renault ने आपली सर्वात स्वस्त KWID चा नवं व्हर्जन लाँच केलं आहे.

या कारची सुरुवातीची किंमत 4.69 लाख (एक्स शोरुम) ठरवण्यात आली आहे.

नव्याने अपडेट केल्यानंतरही कारच्या किंमतीत कोणता बदल करण्यात आलेला नाही. ही कार 3 ड्युअल-टोन एक्सीटरियर पेंट स्कीमसह बाजारात उपलब्ध होणार आहे.

याच्या RXL(O) व्हेरियंटमध्ये कंपनीने 8 इंचाची टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टीम दिली आहे.

याशिवाय हे व्हेरियंट ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससह उपलब्ध आहे. कंपनीने कारची सेफ्टी अधिक चांगली बनवली आहे.

नव्या हॅचबॅक कारमध्ये आता 14 नवे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत, जे स्टँटर्ड आहेत. म्हणजे हे फिचर्स सर्व व्हेरियंटमध्ये मिळणार.

या कारच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

5-स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्स असणारी ही हॅचबॅक कार एकूण 4 व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

याचं टॉप मॉडेल क्लांबर ऑटोमॅटिकची किंमत 6.12 लाख आहे.

याचं ऑटोमॅटिक व्हेरियंट RXL(O) AMT पासून सुरु होतं, ज्याची किंमत 5.44 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार आहे.

मारुती अल्टो K10 चं ऑटोमॅटिक व्हेरियंट VXI AT ची किंमत 5.61 लाखांपासून सुरु होते.

VIEW ALL

Read Next Story