चहा पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का ?

चहामध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही गुणकारी असतात.

कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते. वजन कमी करण्यासाठीही ग्रीन टी पिला जात असतो.

पचनक्रिया चांगली होणे तसेच बद्धकोष्ठता दूर होणे यासाठी हर्बल चहा गुणकारी ठरतो.

चहामध्ये काही प्रमाणात कॅफेन असते. चहा हा पाण्याचा बनलेला असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यासही त्याचा उपयोग होतो. चहामधील नैसर्गिक घटक दातांच्या आरोग्यासाठीही चांगले असतात.

ब्लॅक टी (काळा चहा) आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. खासकरून ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे.

दूध न वापरता केलेला आल्याचा चहा आरोग्यासाठी एक नाही तर अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. यामुळे उलटी, पोटाचे दुखणे, गुडघेदुखी यापासून आराम मिळण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story