स्मार्टफोनच्या व्यवसनाच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी चीन आहे. प्रॉब्लेमेटिक स्मार्टफोन यूजच्या आकडेवारीत चीनचा स्कोर 36.18 आहे
या आकडेवारीत 35.73 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी सौदी अरेबिया आहे तर मलेशिया तिसऱ्या स्थानी आहे.
स्मार्टफोनच्या व्यसनाच्या यादीत चौथ्या स्थानी ब्राझील तर पाचव्या स्थानी साऊथ कोरिया आहे.
या यादीत इराण सहाव्या स्थानी आहे तर कॅनडामधील स्मार्टफोनच्या वापरामुळे हा देश सातव्या स्थानी पोहोचला आहे.
स्मार्टफोन वापराच्या यादीत टर्की आठव्या स्थानी इजिप्त आणि नेपाळ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोबाईलचे व्यसन लागते तेव्हा त्याला वैद्यकीय भाषेत नोमोफोबिया म्हणतात. हा शब्द 'नो मोबाईल फोबिया'पासून बनला आहे.
यामध्ये एखाद्या व्यक्तीला एक प्रकारचा फोबिया होतो. त्याचा मोबाईल त्याच्यापासून दूर जात नाही. नोमोफोबियामध्ये एखादी व्यक्ती मोबाइलशिवाय जगू शकत नाही.
मोबाईलची वारंवार तपासणी, मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर घाबरणे, इंटरनेट काम करत नसल्याची चिंता अशी लक्षणं यामध्ये दिसतात.
नोमोफोबिया हा मानसिक विकार आहे की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही, पण त्याचा मनावर परिणाम नक्कीच होतो. (सर्व फोटो - freepik.com)