शनि प्रदोष व्रतानिमित्त करा हे 5 सोपं उपाय, कुटुंबात नांदेल सुख समृद्धी
आज आषाढ महिन्यातील त्रयोदशी तिथीला शनि प्रदोष व्रत आलं आहे. शनि प्रदोष व्रतासह भगवान शंकराची पूजा करणे हे अतिशय लाभदायक मानलं जातं.
शनि प्रदोश व्रताला एका भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात आपली सावली पाहा. आता हे तेल शनि मंदिरात दान करा. महत्त्वाचं म्हणजे हे तेल दान करताना त्यात एक रुपयाचं नाणं टाका.
शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करा. हा उपाय दर शनिवारी केल्यासही फायदा होतो.
उडीद डाळ, काळे बूट, काळे कपडे या वस्तू शनिवारी दान करा.
व्यवसायात अपेक्ष येतं असेल तर काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घाला.
कुटुंबात सुख समृद्धीसाठी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दान करा.
शनि प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ लावा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)