WTC Final 2023 मध्ये मोडणार 'हे' 10 विक्रम; अंतिम सामना ठरणार ब्लॉकबस्टर
सर डॉन ब्रॅडमन यांच्या एकाच संघाविरोधात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमापासून विराट अवघा काही धावा दूर आहे. तर, ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यांमध्ये 950 चौकार पूर्ण करण्यासाठी त्याला अवघ्या 9 चौकारांची गरज आहे.
WTC Final 2023 चा सामना रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना ठरणार आहे. आतापर्यंत त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 45.66 च्या रन रेटनं 3379 धावा केल्या आहेत.
भारतीय संघातील सलामीवीर शुभमन गिल हा सध्या 890 धावांवर असून, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्याला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 110 धावांची आवश्यकत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससुद्धा WTC Final 2023 च्या निमित्तानं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघाविरोधात 50 Wickets चा विक्रम गाठण्यासाठी त्याला अवघे 4 गडी बाद करण्याची आवश्यकता आहे.
भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर. अश्विन याला क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये 700 विकेटचा विक्रम पूर्ण करण्यासाठी 3 गडी बाद करण्याची आवश्यकता आहे.
जानेवारी 2022 नंतर थेट आता जून 2023 मध्ये कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला क्रिकेटच्या या प्रकारात 5000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 69 धावांची गरज आहे.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेटचा टप्पा गाठण्यासाठी अवघे 3 गडी बाद करण्याची गरज आहे.
क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये 200 झेल टीपण्याच्या अनोख्या विक्रमापासून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेविड वॉर्नर अवघी एक झेल दूर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 गडी बाद करण्यापासून मिशेल स्टार्क फक्त 2 Wickets दूर आहे. त्यामुळं या सामन्यात तो हा टप्पा गाठतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
आयपीएल गाजवणारा आणि ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठा आधार असणारा खेळाडू कॅमरून ग्रीन कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांच्या टप्प्यापासून अवघा 59 धावा दूर आहे.