सेक्रेड गेम्स

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यासह सहकलाकारंच्या दमदार अभिनयानं सजलेल्या 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या पर्वाला चांगलीच प्रेक्षकपसंती मिळाली. या सीरिजमध्ये असणारी इंटीमेट दृश्यही चर्चेचा विषय ठरली.

मिर्झापूर

मिर्झापूर हीसुद्धा प्रेक्षकपसंती मिळालेली अशीच एक वेब सीरिज. दमदार संवाद, दिग्दर्शन असे महत्त्वाचे घटक असणारी ही सीरिज एकदा पाहावीच.

स्कॅम 1992

भारतीय अर्थजगताला हादरवणारा एक घोटाळा आणि हर्षद मेहता यांना जवळून पाहण्याची संधी Scam 1992 या सीरिजमधून मिळते.

द फॅमिली मॅन

मनोज बाजपेयीची मध्यवर्ती भूमिका असणारी 'द फॅमिली मॅन' ही सीरिज तिच्या दोन्ही पर्वांमुळे चर्चेत आली.

अॅस्पिरंट्स

IAS अॅस्पिरंट्सच्या संघर्षाला अधोरेखित करणारी ही सीरिजही प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतेय.

क्रिमनल जस्टीस

कोर्ट रूम ड्रामा आणि कारागृहातील एकंदर वातावरणावर ही सीरिज भाष्य करते.

ब्रिथ

'ब्रिथ' या सीरिजमधून एक हद्द दाखवण्यात आली आहे. एक अशी हद्द जिथं कुटुंबासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला पोहोचू शकते यावर भाष्य करण्यात आलं आहे.

कोटा फॅक्ट्री

देशभरातील कठीण अशा स्पर्धा परीक्षांपैकी एका परीक्षेच्या तयारी दरम्यान्या काहीशा कमालीच्या वातावरणाची झलक या सीरिजमधून पाहता येते.

पंचायत

एक दूरच्या खेडेगावातील पंचायतीचा गोंधळ, गावकऱ्यांचा भाबडेपणा आणि अधिकारी म्हणून आलेल्या व्यक्तीची कोंडी या सीरिजमधून पाहता येते.

पाताल लोक

अनुष्का शर्माच्या निर्मितीत साकारली गेलेली ही सीरिज देशातील आतापर्यंतची सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज आहे.

VIEW ALL

Read Next Story