वर्ल्ड कप 2023 मध्ये क्रिकेटच्या मैदानांवरील खेळपट्टी हा सुद्धा चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.
क्रिकेटची खेळपट्टी ही 22 यार्डची असते, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
पण क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डचीच का असते माहितीये का? आणि एक यार्ड म्हणजे नेमकं किती?
तर क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डची म्हणजेच 66 फूट लांबीची असते. एक यार्ड म्हणजे 3 फूट.
क्रिकेट हा मूळचा ब्रिटीश खेळ आहे आणि ब्रिटीशांनी ज्या ज्या देशांवर राज्य केलं तिथे क्रिकेट प्रामुख्याने खेळलं जातं.
ब्रिटिशांनीच क्रिकेटचे नियम लिहिले आणि तेच पुढे फॉलो करण्यात आले. त्यावरुनच हा 22 यार्डचा नियम ठरला आहे.
18 व्या शतकामध्ये क्रिकेटचे लेखी नियम तयार करण्यात आले तेव्हा ब्रिटनमध्ये लांबी मोजण्याची चैन पद्धत वापरली जायची.
दोरीने लांबी मोजताना तिच्याशी छेडछाड करुन लांबी कमी जास्त मोजण्याचा धोका लक्षात घेत लोखंडाच्या चैनीने लांबी मोजली जायची म्हणून त्याला चैन पद्धत असं नाव पडलं. यावरुनच क्रिकेट पिच 22 यार्डाचं झालं.
एक चैन अंतर म्हणजे 22 यार्ड. यावरुनच क्रिकेटचे नियम लिहिताना खेळपट्टी ही 22 यार्डाची हवी हे निश्चित करण्यात आलं.
जगभरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये एकसंघता रहावी म्हणून आज जगात कुठेही प्रोफेश्नल क्रिकेट खेळताना 22 यार्डाच्या पिचचा नियम पाळलाच जातो.