भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ एकमेकांसमोर येणार
मीडिया रिपोर्टनुसार, गोल्ड आणि सिल्वर रंगात दिसणारी ही ट्रॉफीची अतिशय साधे सिंपल डिझाइन आहे.
वर्ल्ड कपची ट्रॉफी चांदी आणि सोन्याने बनवलेली आहे. ट्रॉफीच्या मध्यभागी असलेला चेंडू सोन्याचा आहे.
तसेच ट्रॉफीमध्ये असलेले तीन स्तंभ चांदीचे असतेत. ट्रॉफीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, या वेळेची ट्रॉफी आतापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या महागड्या ट्रॉफीपैकी एक आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या ट्रॉफीची किंमत जवळपास 30,000 डॉलर म्हणजे 24,76,650 रुपये असणार आहे.
भारताने वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे. याअगोदर 2011 मध्ये भारताने यजमानपद निभावलं आहे
वर्ल्ड कपकरिता दोन ट्रॉफी असतात. मुख्य ट्रॉफी आणि दुसरी ट्रॉफी. दुसऱ्या ट्रॉफी विजेत्यासोबत जाते
ट्रॉफीमध्ये सगळ्या विजेता संघाचे नाव असतात.