हा चिमुकला आज आहे अनेकांचाच आदर्श...

एका खास व्यक्तीचे काही फोटो नुकतेच समोर आले आणि सोशल मीडिया फीड स्क्रोल करता करता अनेकांच्या नजरा तिथंच थांबल्या. हा चिमुकला आहे तरी कोण हाच प्रश्न अनेकांना पडला.

या चिमुकल्याचं नाव...

व्यवस्थित पाहिल्यास काही गोष्टी लक्षात आल्या, अधोरेखित झाल्या आणि अखेर या चिमुकल्याचं नाव लक्षात आलं. अगदी बरोबर, हा आहे भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहली.

यशाच्या शिखरावर

कारकिर्दीत सध्या यशाच्या शिखरावर असणाऱ्या विराटनं नुकतीच एका विक्रमाची बरोबरी केली आणि क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकर यानंही त्याचं कौतुक केलं.

निरागस चेहरा

विराटच्या बालपणीचे हे फोटो पाहताना त्याच्या निरागस चेहऱ्यानं अनेकांच्याच मनाचा ठाव घेतला.

संघर्ष

अर्थात इथं विराटचा संघर्ष विसरून चालणार नाही. वडिलांच्या निधनानंतर एका स्वप्नपूर्तीसाठी त्यानं प्रचंड मेहनत करण्यास सुरुवात केली.

आदर्श

पाहता पाहता भारतीय क्रिकेट विश्वात विराट कोहली हे नाव इतकं प्रसिद्धीझोतात आलं की आजच्या पिढीसाठी तर, तो आदर्श ठरला.

एककेंद्री वृत्ती

जीवनातील अनेक आव्हानांना तोंड देणाऱ्या विराटनं एका टप्प्यावर स्थुल शरीरावर मात करून सुदृढ शरीर कमावलं. यासाठी त्यानं समर्पक आणि एककेंद्री वृत्तीनं काम केलं.

विराट

असा हा विराट यंदाच्या वर्षी टीम इंडियातून खेळत भारताला वर्ल्ड कप मिळवून देणार याची अनेकांनाच खात्री आहे.

अतुलनीय नोंद

तेव्हा आता तो क्षण कधी येतो आणि त्याच्या कारकिर्दीत आणखी एक अतुलनीय नोंद केली जाणार याच क्षणाची क्रिकेटप्रेमी आणि विराटचे चाहते वाट पाहत आहेत. ( सर्व छायाचित्रं सौजन्य- comedyculture.in)

VIEW ALL

Read Next Story