अनेकदा काही अशा गोष्टी घडतात ज्यामुळे डोकं अतिशय खराब होऊन जातं. डोकं अशांत करण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरतात.
जर तुम्हाला डोकं, मन शांत ठेवायचं असेल तर दररोज न चुकता योगा करायला हवं.
डोकं शांत आणि निवांत ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत गरजेची असते. त्यामुळे किमान 7 ते 8 तास तरी झोप घ्या.
कायम स्वतःला सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुमचं मन आणि मेंदू शांत राहण्यास मदत होते.
आवडीचं काम तुम्हाला आनंद आणि समाधान देते. त्यामुळे मन, डोकं शांत ठेवण्यासाठी आवडीचं काम अतिशय प्रेमाने करा.
कुणाबद्दल वाईट विचार करणे किंवा मनात असुया ठेवल्यामुळे तुमचं मन शांत राहणार नाही. यामुळे सतत वाईट विचार डोकं शांत राहू देत नाहीत.
कोणतंही काम नाकारु नको, प्रेमाची भावना महत्त्वाची आहे. प्रेमात, आनंदाने काम करा. कोणतंही काम नाकारु नका.
कायम स्वतःला महत्त्व द्या आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा आनंद डोकं शांत ठेवायला मदत करतात.
कधी कुणाला जास्त महत्त्व देऊ नका. कोण काय विचार करतंय? याचा फार विचार करु नका.