पुढच्या टेस्ट सामन्याला कर्णधार मुकणार? पुन्हा होणार 'बाबा'

एकीकडे भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात देखील टेस्ट सिरीज सुरु आहे.

दक्षिण आफ्रिकेनंतर या मालिकेनंतर न्यूझीलंडचा आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 मालिका होणार आहे.

या सिरीजपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.

या सिरीजला न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन मुकण्याची शक्यता आहे. इकतंच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पुढच्या टेस्टला देखील तो मुकण्याची शक्यता आहे.

याचं कारण म्हणजे केन विलियम्सन लवकरच बापमाणूस होणार असल्याची माहिती मिळतेय. केन विलियम्सन यापूर्वी दोन मुलं आहेत.

आयसीसीच्या ताज्या क्रमावारीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये केन विलियम्सन जगातील नंबर वन फलंदाज आहे.

VIEW ALL

Read Next Story