रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट योग्य की अयोग्य? जाणून घ्या

सुकामेवा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. विशेषत: हिवाळ्यात अनेक लोक बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता यासारखे ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो.

ड्रायफ्रूटमध्ये शरीराला लागणारे पोषकतत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

ड्रायफ्रूट खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. तसेच ड्रायफ्रूट्स हे वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात.

पण रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाणे योग्य की अयोग्य? याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही ड्रायफ्रूट हे पचण्यास कठीण असतात. त्यामुळे हे ड्रायफ्रूट खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते.

रिकाम्या पोटी ड्रायफ्रूट्स खाण्यापूर्वी ते पाण्यात भिजवून खा. यामुळे त्याचे पचन लवकर होते. तसेच आरोग्यासाठीही हे फायदेशीर असते.

बदाम, आक्रोड, खजूर हे ड्रायफ्रूट रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन करावे. यामुळे पचनशक्ती सुधारते.

सुकामेवा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्या.

VIEW ALL

Read Next Story