WTC फायनल सामना ड्रॉ झाला तर... कोण असेल चॅम्पियन?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत.
येत्या 7 तारखेपासून 11 जूनपर्यंत इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाईल.
या सामन्यासाठी 12 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सामना निकाली लागण्याची शक्यता जास्त आहे.
कसोटी सामने अनेकदा ड्रॉच्या दिशेने जातात. त्यामुळे जर हा सामना ड्रॉ राहिला तर?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना ड्रॉ राहिला तर, दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येणार आहे.
टीम इंडियाचा प्रयत्न हा सामना जिंकण्याचा असणार आहे. त्यासाठी आता विराट आणि रोहित दोघंही तयारीला लागले आहेत.
सामन्यात अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवर मोठी भिस्त असणार आहे.